'गाढवा'वर स्वार होऊन येत आहे मकर संक्रांती  
					
										
                                       
                  
				  				   
				   
                  				  सूर्याने एका राशीतून दुसर्या राशीत जाणे म्हणजे 'संक्रमण करणे'. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. यामुळे या सणाला 'मकरसंक्रांत' असे म्हणतात. या दिवशी सूर्य पृथ्वीची परिक्रमा करण्याची दिशा बदलवतो. म्हणजेच सूर्य थोडा उत्तरेकडे झुकतो. यामुळे या वेळेला उत्तरायण असेही संबोधतात. सूर्याच्या संक्रमणासोबतच जीवनाचे संक्रमण जोडले आहे. यामुळे या उत्सवाला सांस्कृतिक दृष्टीनेही महत्त्व आहे. 
				  													
						
																							
									  
	 
	वर्ष 2020 मध्ये संक्रातीचे वाहन आहे गाढव. मंगळवार दि. 14 जानेवारी 2020 म्हणजेच शके 1941 पौष कृ. 4 रोजी उत्तररात्री 2.07 वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे.  
				  				  
	 
	संक्रांतीचा पुण्यकाल - बुधवार दि. 15 जानेवारी 2020 रोजी सूर्योदयपासून सूर्यास्तापर्यंत आहे. 
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	हे संक्रमण तैतील करणावर होत असल्याने वाहन गाढव आहे. उपवाहन मेंढा आहे. तिने पांढरे वस्त्र परिधान केले असून हातात दंड घेतला आहे. गोपी चंदनाचाटिळा लावलेला आहे. वयाने तरुणी असून निजलेली आहे. वासाकरिता केवड्याचे फूल घेतलेले आ हे. पक्वान्न भक्षण करीत आहे. तिची जाति पक्षी आहे. भूषणार्थ हीरा धारण केला आहे. वार नाव महोदरी व नाक्षत्र नाव घोरा असून सामुदाय मुहूर्त 30 आहेत. पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. 
				  																								
											
									  
	 
	संक्रांतीचे फळ - संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत. त्या वस्तू महाग होतील. संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. 
				  																	
									  
	 
	पर्वकालात द्यावयाचे दान - नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिलपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दाने द्यावीत.  
				  																	
									  
	 
	किंक्रांत - करिदिन गुरुवार दि. 16 रोजी आहे. 
	 
	संक्रांतीमध्ये वर्ज्य कर्मे - दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष - गवत तोडणे, गाई - म्हशींची धार काढणे व कामविषय सेवन ही कामे करू नयेत.