शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: न्यूयॉर्क , सोमवार, 6 ऑगस्ट 2018 (11:12 IST)

सोनाली बेंद्रेची भावनिक साद : ऋणी आहे, एकटेपणा जाणवू दिला नाही

बॉलिवूडची प्रतिभाशाली व गुणी अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या कॅन्सरशी धीरोदत्तपणे लढत आहे. सोनाली उपचारासाठी सध्या न्यूयॉर्कमध्ये असली, तरी तिला मायदेशातून भेटण्यास जाणार्‍यांची संख्येमध्ये काही कमी झालेली नाही. तिने रविवारी फ्रेंडशिपदिनी एक स्पेशल पोस्ट करत मित्रांचे आभार मानले आहेत. 
 
सोनालीने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये सुझान खान, गायत्री ओबेरॉय सुद्धा दिसत आहे. सोनालीने आपल्या पोस्टध्ये म्हटले आहे, की हो या क्षणी तुम्हाला दिसणारी मी तीच असून अत्यंत आनंदी आहे. लोकांना माझ्या दिसण्यावरून थोडा विचित्रपणा वाटत असला, तरी मी त्याबाबत स्पष्ट करू इच्छिते. मी सध्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ इच्छिते आणि त्यासाठीच प्रयत्न करत आहे. काहीशा वेदना होत आहेत व ऊर्जासुद्धा कमी झाली आहे, पण मला जे आवडत ते मी मनापासून करत आहे. लोकांसोबत वेळ व्यतीत करत असल्याने खूप आनंदी आहे. त्यामुळे त्या सर्वांची मी मनापासून ऋणी आहे. माझ्या ताकदीचे ते स्तंभ आहेत. व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून मित्रपरिवार मला भेटण्यासाठी येत आहे, फोन करत आहेत, संदेश पाठवत आहेत. त्यामुळे एकटेपणा कधीच जाणवला नाही. तुम्ही दिलेल्या मैत्री प्रेमामुळे मनापासून ऋणी आहे, तुम्हा सर्वांचा आशीर्वाद पाठीशी आहे. पोस्टच्या शेवटी तिने मजेशीर उल्लेख केला आहे. डोक्यावर केसच नसल्याने मला तयारीसाठी कमी वेळ लागतो, असे सोनालीने नमूद केले आहे. व्हायरल झालेला फोटो हृतिक रोशनने क्लिक केल्याने सोनालीने म्हटले आहे.