मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 6 ऑगस्ट 2018 (09:06 IST)

केवळ अध्यादेश काढून आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही : मुख्यमंत्री

मराठा समाजातील आरक्षणाबाबत जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी आणि सत्य माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  जनतेशी संवाद साधला. या संवादावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाची डेटलाईनच दिली आहे. केवळ अध्यादेश काढून आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. पण, नोव्हेंबर महिन्यापर्यंत आरक्षणाची प्रकिया पूर्ण होईल, तोपर्यंत मेगा भरती होणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
 
इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल. पण, तरुणांनो आत्महत्या करु नका, असे भावनिक आवाहन मुख्यमंत्र्यांनी मराठा आंदोलनातील तरुणांना केले आहे. केवळ तत्काळ अध्यादेश काढून प्रश्न मार्गी लागणार नाही. राज्य मागावर्ग आयोगाचा अहवाल लवकरच येईल. उच्च न्यायालयाने तसे आदेशही दिले असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.