गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

'या' वक्तव्याची लाज वाटायला हवी : डायना हेडन

माजी मिस वर्ल्ड डायना हेडन हिने त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देब यांना चांगले उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री देब यांना आपल्या वक्तव्याची लाज वाटायला हवी, या कमेंट दुखावणाऱ्या आहेत, असं डायनानं म्हटलंय. लहानपणापासून आपण गोऱ्या रंगाला दिल्या जाणाऱ्या प्राथमिकतेविरुद्ध आणि त्या मानसिकतेविरुद्ध लढा दिल्याचंही डायना हेडन हिनं म्हटलंय. याआधी त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव कुमार देब यांनी डायना हेडन हिला देण्यात आलेल्या 'मिस वर्ल्ड' पुरस्काराबाबत त्यांनी टीका केलीय. तिचा विजय हा फिक्स असल्याचा त्यांनी आरोप केला. 
 
'हे खूप दुखावणारं आहे. जेव्हा तुम्ही जगातील सर्वात मोठी आणि सर्वात सन्मानित सौंदर्य स्पर्धा जिंकता, देशाचा मान वाढवता... गव्हाळ रंगांच्या भारतीय सुंदरतेला मान मिळवून देण्यासाठी कौतुक करायचं सोडून तुम्ही त्यावर टीका करता' असंही डायना हिनं म्हटलंय.