शनिवार, 27 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 5 जानेवारी 2019 (09:41 IST)

नशीब बलवान म्हणून सव्वा वर्षांचं बाळ आश्चर्यकारकरित्या बचावले

The baby
मुंबईतील गोवंडीत चौथ्या मजल्यावरुन पडूनही सव्वा वर्षांचं बाळ आश्चर्यकारकरित्या बचावले आहे. जय गोपी कृष्णा सोसायटीत चौथ्या मजल्यावर बरकडे कुटुंबीय राहतात. बाल्कनीत खेळता खेळता याच फ्रेंच विंडोमधून अवघ्या सव्वा वर्षाचा अथर्व खाली पडला. अर्थव तब्बल चौथ्या मजल्यावरुन खाली पडला. पण सुदैवाने तो झाडांमध्ये अडकत अडकत खाली आला आणि खाली पडला. एवढ्या उंचावरुन पडूनही दैव बलवत्तर म्हणून अथर्वला फक्त खरचटले आहे. बरकडे कुटुंब गेल्या वर्षभरापासून या इमारतीत राहत आहेत. या इमारतीच्या बिल्डरनं वर्षभर खिडक्यांना गज बसवले नाहीत.