बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 2 जानेवारी 2019 (09:41 IST)

जळगाव येथे विना परवाना नवीन वर्षाची पार्टी ६ महिला १८ पुरुष ताब्यात

नववर्षाच्या स्वागतासाठी जळगावच्या मुमराबाद रोडवरील कोल्हे फार्महाऊसवर विनापरवाना नाचगाणे सुरू होते. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी  रात्री १ ते १.३० वाजेच्या सुमारास फार्महाऊसवर धाड टाकत, ६ महिला आणि १८ पुरुषांना ताब्यात घेतले आहे. हे फार्महाऊस हे एका राजकीय पुढाऱ्याचं आहे असे समोर येते आहे. मुमराबाद रोडवरील कोल्हे फार्म हाऊसवर रात्री विनापरवाना नाचगाण्याचा कार्यक्रम सुरू होता. पोलिसांनी यावेळी शबनम बिजली कव्वाल (वय ५०) प्रतापपुरा, महबी दयानंद वार्ड बऱ्हाणपूर, जुलेखा बानो नुरी साबी कव्वाल (वय ४५), हिना शेख सईद शेख (वय २६), शरहाब मोहमद जमाल (वय २२), नमीदा बानो मोहमद जमाल (वय २०), रूबी शादाब परवेझ (वय २४), सैय्यद नविद सैय्यद मतीन (वय २६), गिरीश प्रकाश लाहोटी (वय ३८) जळगाव, करीम खान अब्दुल खान (वय २८) बऱ्हाणपूर, दिलीप दीपक रंगला (वय ३५) टेलीफोन नगर जळगाव, प्रशांत विश्वनाथ अग्रवाल (वय ३८) बालाजी पेठ जळगाव, चंद्रकांत राजाराम खडके (वय ५२) विठ्ठल जळगाव, कमलाकर तुकाराम वानखेडे रथ चौक जळगाव, राजेश गोविंद माहेश्वरी (वय ३६) जळगाव, प्रवीण सोन मलजी जैन (वय ३७) बळीराम पेठ जळगाव, विशाल ओमप्रकाश वर्मा (वय ३७) बीजे मार्केट जळगाव, सर्फराज निनाज शेख (वय २०) मास्टर बँड जळगाव, नाना बाहऱ्या बारेला (वय २३) मुमराबाद, लाला बाहऱ्या बारेला (वय २२) ममुराबाद, नितीन अशोक वाणी (वय ३२) मोहन नगर महाबल जळगाव, मुन्ना बारेला (वय ३५) मुमराबाद, भारत राजकुमार तरलेजा सिंधी कॉलनी जळगाव, तरूण रंगलाल टेलिफोन नगर जळगाव, दिलीप शालिग्राम पाटील (वय ५४) पाळधी ता धरणगाव यांना ताब्यात घेण्यात आले आहे.