शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 21 सप्टेंबर 2022 (18:24 IST)

मोबाईल हिसकावल्यामुळे मुलाने घरच उध्वस्त केलं

तंत्रज्ञानाचा जेवढा फायदा आहे तेवढे तोटे देखील आहे. आजकाल मोबाईलचे व्यसन लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वाना लागले आहे. मोबाईल नसेल तर लहान मुलं जेवत नाही. लहान मुलाना कमी वयात मोबाईल दिल्याने त्यांच्या आरोग्यावर आणि डोळ्यांवर परिणाम पडतो. या शिवाय मुलांना मानसिक आजार देखील होतात. पूर्वी मुलं मैदानी खेळ खेळायचे पण आता कुटुंब लहान असल्यामुळे आणि आई वडील दोघेही कामाला जात असल्यामुळे मुलांना मोबाईल दिले जाते. या मोबाईलचे व्यसन मुलांना एवढे लागते की उठता, बसता, खाता -पिता, झोपताना त्यांना मोबाईल हवा असतो. मोबाईल दिला नाही तर मुलं असं काही करतात ज्याची आपण कल्पना करू शकत नाही. असेच काहीसे घडले आहे. ज्याची कल्पना कोणत्याही पालकाने केली नसेल. एका 15 वर्षाच्या मुलाचा हातून आईने मोबाईल हिसकावून घेतल्यावर त्याने जे काही केले त्याची कोणीही कल्पना केली नसेल. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयपीएस अधिकारी सुधांशु काबरा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहाल तर तुम्हीही चक्रावाल. एका महिलेने तिच्या 15 वर्षांच्या मुलाच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला. यानंतर मुलाने जे केले ते पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. क्षणभर तुमचाही विश्वास बसणार नाही की एक 15 वर्षांचा मुलगा असे भयंकर काहीतरी करु शकतो.हा धक्कादायक व्हिडीओ शेअर करताना IPS यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘घरातील हा विध्वंस एका 15 वर्षांच्या मुलामुळे झाला कारण त्याच्या आईने त्याचा मोबाईल घेतला. आजच्या पिढीला मोबाईलचे व्यसन टाळण्यासाठी आणि भावना आणि एक्शन्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुलांवर संस्कार करणे किती महत्त्वाचे आहे
 
व्हिडीओमध्ये दिसणारा हा विध्वंस कोणत्या भुकंपामुळे झालेला नाही आणि ना ही कृत्य कोणत्या चोराचे आहे. तर फक्त 15 वर्षांच्या मुलाने ही घरची अशी अवस्था केली आहे. फोन हिसकावल्याचा मुलाला इतका राग आला की त्याने संपूर्ण घर उद्ध्वस्त केले.
 
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की घराची खोली कशी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. सगळीकडे तोडफोड करण्यात आली आहे. फ्रीज, टीव्हीपासून ते किचन, टेबल, सोफा सर्वकाही उद्ध्वस्त झालेलं आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यानी काय बोलावं हेच त्यांना सुचेनासे झाले आहे.