सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: रविवार, 7 जानेवारी 2024 (15:55 IST)

लग्नमंडपात नवरीच्या मागे लागला कुत्रा, व्हिडीओ व्हायरल!

bride video
social media
कुत्रा मागे लागल्यावर चांगलीच दमछाक होते. रस्त्यावर जाताना कुत्रे सहसा मागे पडतात पण लग्न मंडपात एका नवरीच्या मागे कुत्रा लागल्यावर तिने पळ काढल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर अनेकदा गमतीदार व्हिडीओ व्हायरल होतात. हे फार मजेशीर असतात.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत लग्नमंडपात एका नवरीच्या मागे कुत्रा लागला आणि मजेशीर असं की नवरी पुढे पुढे धावत होती आणि कुत्रा तिच्या मागेमागे धावत होता.नवरीच्या घागऱ्यामुळे तिला पळता येत नव्हते.

मंडपात वऱ्हाडी असून देखील कोणात देखील कुत्र्याला थांबवण्याची हिम्मत होत नव्हती. त्यांच्या धावपळी मध्ये पूजेचे सामान देखील विखुरले होते.नवरीला कुत्र्यांपासून वाचविण्यासाठी लोकांची धावपळ सुरु होती. मात्र कुत्र्याजवळ जाण्याची हिम्मत कोणामध्ये नव्हती. 

अशा परिस्थितीत नवरदेव पुढे आला आणि त्याने नवरीला कुत्र्यापासून वाचवले. आणि कुत्रा तिथून पळून जातो. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.   
 
Edited By- Priya Dixit