गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 डिसेंबर 2023 (11:39 IST)

Matar Paneer मध्ये पनीर नसल्यामुळे वऱ्हाड्यांमध्ये हाणामारी

Paneer Peas Masala
Shadi Video सोशल मीडियावर लग्नाचे व्हिडिओ सतत अपलोड होत असतात. लोकांना इथे दिसणारी वेगवेगळी दृश्ये आवडतात. कधी वधू-वर एकमेकांशी भांडताना दिसतात तर कधी एखाद्याचा डांस व्हायरल होतो तर कधी कपल्सची रोमँटिक स्टाईल पाहायला मिळते. फनी डान्स ते मारामारीपर्यंतच्या लग्नाच्या मिरवणुकीचे व्हिडिओही अपलोड केले जातात. नुकताच असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये लग्नातील पाहुणे पनीरसाठी आपापसात भांडताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
 
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की लोक लग्नात मेजवानीचा आनंद लुटण्याऐवजी अचानक एकमेकांना भिडले. लग्नाचे वातावरण अचानक आखाड्यात बदलले. लोक एकमेकांना लाथा-बुक्क्या मारू लागले. संतापलेल्या लोकांनी खुर्च्या फेकून एकमेकांना मारहाणही सुरू केली. कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, भाजीमध्ये पनीर नसल्यामुळे राडा घालण्यात आला. मटर पनीर करीमध्ये पनीर नसल्याने लग्नातील पाहुण्यांमध्ये भांडण झाले. आता हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होऊ लागला आहे.
 
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहाल की लोकांमध्ये बराच वेळ भांडण सुरू होते. मारामारीमुळे संपूर्ण वातावरण बिघडलं. लोक इकडे तिकडे धावू लागले. सर्व सामान जमिनीवर विखुरलेले दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ज्या प्रकारचा नजारा दिसतो तो सहसा कुठे दिसत नाही. हा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. काही सेकंदाचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की वर-वधू पक्षाचे लोक पनीरसाठी आपसात भिडले कारण मटर पनीरमध्ये पनीर नव्हतं.