सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 25 जून 2022 (17:25 IST)

मुख्याध्यापकाची शिक्षिकेला चपलेने मारहाण ,मुख्याध्यापकांना निलंबित केले

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे एका सरकारी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाने महिला शिक्षिकेला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या शिक्षिकेस शाळेत यायला 10 मिनिटे उशिर झाला होता. याचा राग मनात धरुन मुख्याध्यापकांनी आधी शिक्षिकेला शिवीगाळ केली, नंतर मारहाण करण्यास सुरुवात केली.याप्रकरणी आरोपी मुख्याध्यापकाला शुक्रवारी तडकाफडकी निलंबित करण्यात आले. आरोपी मुख्याध्यापक पासगनवा ज्युनियर हायस्कूलमध्ये संलग्न आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे.
 
मुख्याध्यापक अजित कुमार यांना महिला शिक्षामित्रावर मारहाण केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. ते म्हणाले की अजित कुमार यांनी त्यांच्या पदाची प्रतिमा डागाळली आणि शाळेतील शिक्षकांच्या आचारसंहितेचे उल्लंघन केले. ही शाळा लखीमपूर ब्लॉकमध्ये येते.
 
या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. प्राचार्य अजित कुमार हे सर्वप्रथम शिक्षिका सीमा देवी यांना शिवीगाळ करत असल्याचे दिसून येते. तिने त्यांना विरोध केल्यावर अजितने सीमाला चपलेने मारायला सुरुवात केली. शेजारी उभे असलेले इतर शिक्षक त्यांना थांबवतात, मात्र त्यानंतरही ते थांबत नाहीत. सीमा देवीनींही बचावात त्यांच्यावर हल्ला केला. तिथे उभी असलेली मुलेही शिक्षक आणि मुख्याध्यापकांमध्ये सुरू असलेली ही झुंज पाहत होती.
 
याप्रकरणी सीमा देवी यांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळपासून त्यांच्या घरात लाईट येत नव्हती. त्यामुळे त्याला घराबाहेर पडण्यास उशीर झाला. त्या शाळेत पोहोचल्या तेव्हा हजेरी नोंदवहीवर गैरहजरी दाखवली होती. मी मुख्याध्यापकांना गैरहजेरी काढण्यास सांगितले असता त्यांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली. घटना ब्लॉक परिसरातील मामू खेडा या प्राथमिक शाळेची आहे. सीमा पाचवीपर्यंतच्या मुलांना शाळेत शिकवतात.