गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 16 मे 2022 (21:36 IST)

पुण्यात भाजप कार्यकर्त्याकडून राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्तीला मारहाण

smirti irani
राणी या आज एका कार्यक्रमासाठी पुण्यात आलेल्या होत्या. या कार्यक्रमापूर्वी स्मृती इराणी ज्या हॉटेलमध्ये थांबलेल्या होत्या, त्या जे. डब्ल्यु. मॅरियेट हॉटेलमध्ये राष्ट्रवादीच्या  कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. महागाईविरोधात हे आंदोलन सुरु होतं. यादरम्यान इथे मोठा गोंधळ झाला, त्यानंतर स्मृती इराणी या ज्या कार्यक्रमासाठी आलेल्या होत्या, त्या कार्यक्रमस्थळी देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणा केली.
 
राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत स्मृती इराणींचा निषेध करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान राष्ट्रवादी अन् भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आले आणि त्यानंतर थेट मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. याबद्दलचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये काही राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना बाहेर काढताना दिसत आहेत. यावेळी भाजपच्या एका कार्यकर्त्याने राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांवर थेट हात उगारल्याचं दिसतंय.
 
उद्धव ठाकरेंच्या सभेला 35 हजर लोक, त्यातले 8 हजार फेरीवाले...वाचा राणे काय म्हणाले
स्मृती इराणी यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या वैशाली नागवडे यांना यांना भाजप कार्यकर्त्याने मारहाण केली. याबद्दल बोलताना वैशाली नागवडे यांनी सांगितलं की, आम्ही लोकशाही पद्धतीनं आंदोलन करत होतो, निवेदन देण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी तिथे उपस्थित असलेले पोलीस आमच्याकडे आले, नंतर भाजप कार्यकर्ते आले आणि त्यानी मारहाण करायला सुरुवात केली. सुरुवातील महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केली आणि त्यानंतर एका पुरुष कार्यकर्त्याने देखील मारहाण केल्याचं व्हिडिओमधून समोर आलं.