तरुणाने केले किंग कोब्रा सापाला किस
Photo- Instagram
किंग कोब्रा हा सर्वात विषारी साप म्हणून ओळखला जातो. त्याने दंश केल्यावर माणूस क्षणातच दगावतो. मात्र या तरुणाने चक्क त्याच्या कपाळी किस केलं आहे.
अक्षरश: काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओ मध्ये एक विषारी किंगकोब्रा दिसत आहे. तो तरुण हळू- हळू सापाच्या जवळ जातो आणि त्याच्या कपाळावर किस करतो. साप हल्ला करेल की काय असं वाटते मात्र साप त्याच्यावर हल्ला करत नाही. हा व्हिडीओ काळजाचा ठोका चुकवणार आहे.
हा व्हिडीओ snake_lover_narasimha या अकाऊंटने शेअर केला आहे. या व्हिडीओला सुमारे दोन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहे. या वर अनेक जण आपली प्रतिक्रिया देत आहे.
Edited by - Priya Dixit
