1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Updated : शुक्रवार, 13 एप्रिल 2018 (09:19 IST)

सोलापूर : दोन डोके असलेल्या विचित्र बालकाचा जन्म

सोलापुरातील  सिव्हील हॉस्पिटलमध्ये गुरुवारी दोन डोके असलेल्या विचित्र बालकाचा जन्म झाला. त्याला दोन हृदय, दोन श्वसन व अन्ननलिका आहेत. या रुग्णालयात अशी प्रसूती पहिल्यांदाच झाली आहे. 

 वैद्यकीय नियमांप्रमाणे संबंधित मातेची प्रसूतीपूर्व सोनोग्रॉफी करण्यात आली. यावेळी सयामी (जुळे) बाळ असल्याची कल्पना त्यांना देण्यात आली. गुरुवारीसकाळी या मातेचे सिझर केले असता प्रसूतीनंतर दोन डोके असलेले बाळ जन्मले. वैद्यकीय परिभाषेत याला ‘कोजाईन्ड टिष्ट्वन’ म्हटले जाते. जन्माला आलेल्या बाळाला दोन हृदय, दोन श्वसननलिका, दोन हात, दोन पाय, एक लिव्हर आणि दोन किडनी असून शरीर मात्र एकच आहे. या बालकाला रुग्णालयातील बी ब्लॉकमध्ये नवजात शिशू अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या बाळाला आॅक्सिजन, सलाईन व अन्य औषधे सुरु आहेत. या बाळाची प्रकृती चिंताजनक आहे. असा प्रकारे जन्मणारे बाळ लाखात एक असू, शकते.