संबंधित माहिती
- इंडिगो एयरलाईन्स ला मोठा तोटा, लॉक डाऊन मुळे रद्द झालेल्या तिकिटाचे पैसे परत केले
- 'शिवशाहीर' 'महाराष्ट्र भूषण 'पद्मविभूषण ' शिव आराधक' बाबा साहेब पुरंदरे
- मानहानीकारक ट्वीट डिलीट करा, बिनशर्त माफी मागा: मलिक यांना अमृता फडणवीस यांची कायदेशीर नोटीस
- PUBG New State भारतात लाँच, या प्रकारे करता येईल रजिस्ट्रेशन
- Viral Video आजींनी पहिल्यांदाच पिझ्झा ट्राय केला, क्यूट एक्सप्रेशनमुळे व्हायरल झाल्या
सर्व प्रोटोकॉल बाजुला ठेवत महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांनी वाचवले प्रवाशाचे प्राण; पंतप्रधान मोदींनीही केलं कौतुक
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड सध्या एका वेगळ्या कारणांमुळे सोशल मीडिया ते प्रत्येक प्लॅटफॉर्मवर चर्चेत आहेत. मंगळवारी एका विमान प्रवासा दरम्यान केंद्रीय मंत्री डॉ. कराड यांनी मंत्रिपदाच्या कोणत्याही प्रोटोकॉलची काळजी न करता प्रवाशाचा जीव वाचला.
नेमकं काय घडलं?
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड हे दिल्लीवरुन मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानातून प्रवास करत होते. तेव्हा कराड यांच्या मागील सीटवर बसलेल्या व्यक्तीची अचानक प्रकृती बिघडली. तेव्हा केबिन क्रूने फ्लाइटमध्ये कोणी डॉक्टर असेल तर मदत करावी अशी विनंती केल्यावर डॉक्टर भागवत कराड मदतीसाठी पुढे आले. डॉक्टर कराड यांनी प्रवाशाला प्रथमोपचार दिले आणि फ्लाइटमध्ये उपलब्ध असलेल्या इमर्जन्सी किटमधून प्रवाशाला इंजेक्शनही दिले.
Our heartfelt gratitude and sincere appreciation towards MoS for ministering to his duties non-stop! @DrBhagwatKarad your voluntary support for helping out a fellow passenger is ever so inspiring. https://t.co/I0tWjNqJXi
— IndiGo (@IndiGo6E) November 16, 2021
इंडिगो एअरलाइन्सने डॉक्टर कराड यांचे आभार मानत फोटो ट्विट केला आहे.
A doctor at heart, always!
— Narendra Modi (@narendramodi) November 16, 2021
Great gesture by my colleague @DrBhagwatKarad. https://t.co/VJIr5WajMH
पंतप्रधान मोदींनीही इंडिगोचे हे ट्विट कोट करुन रिट्विट करत, डॉ. भागवत कराड यांचं कौतुक केलं आहे.
पुढील लेख
