फेसबूक, इंस्टाग्रामवर यूजर्सला वयाचा पुरावा द्यावा लागणार
फेसबूक आणि इंस्टाग्रामने आपल्या यूजर्स पॉलिसीमध्ये मोठा बदल करण्याचे ठरवले आहे. याअंतर्गत फेसबूक व इंस्टाग्राम या सोशल साईटवर अकाउंट काढायचे असल्यास यासाठी यूजर्सला ऑफिशियल फोटो आईडी म्हणजे वैध ओळखपत्रावरुन आपल्या वयाचा पुरावा द्यावा लागणार आहे.
या ऑनलाईन साईटवर काम करणार्या नियंत्रकांना साईटवर कुठल्या यूजर्सचे वय १३ पेक्षा कमी वाटल्याची शंका आल्यास त्यांचे प्रोफाइल लॉक केले जाऊ शकते. आता फक्त कंपनीकडून यूजर्स अकाउंटची पडताळणी करण्याची शक्यता आहे.
फेसबूक आणि इंस्टाग्रामवर अकाउंट काढण्यासाठी युजर्सचे वय १३ वर्षापेक्षा जास्त असण्याचा नियम आहे. सोशल साईटवर अकाउंट काढायचे असल्यास युजर्सला त्याची जन्मतारीख विचारली जाते, पण त्याची पडताळणी केली जात नाही. म्हणजे जन्मतारीख खरी आहे की खोटी याची पडताळणी केली जात नाही. याचाच फायदा घेत युजर्स खोटी जन्मतारीख सांगून अकाउंट काढतात. यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे.