रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 24 मे 2018 (08:57 IST)

इंटरनेटला 'व्हेगा स्टेलर' व्हायरसचा धोका

आता इंटरनेटमध्ये एक असा व्हायरस पसरत आहे ज्यामुळे क्रोम आणि फायरफॉक्स या ब्राऊजरमध्ये सेव्ह असलेले सगळे पासवर्ड चोरु शकेल. विशेष म्हणजे या व्हायरसमुळे  मोबाईल किंवा लॅपटॉपवर डेबिट आणि क्रेडिट कार्डसचे डिटेल्स सेव्ह केले असतील तर तेही चोरले जाऊ शकतात. या व्हायरसचे नाव व्हेगा स्टेलर असून हा व्हायरस संवेदनशील माहिती चोरण्यासाठी तयार करण्यात आला आहे. याद्वारे युजरच्या कॉम्प्युटरमधील ऑटोफील डेटा चोरता येतो. त्यामुळे आर्थिक व्यवहार तसेच इतर व्यवहारांच्यादृष्टीने हा व्हायरस धोकादायक आहे.
 

हा व्हायरस मार्केटींग, अॅडव्हर्टायजिंग आणि पब्लिक रिलेशन या क्षेत्रात वेगाने पसरवला जात आहे. ईमेलद्वारेही हा व्हायरस पसरवला जात आहे. या ईमेलचा सब्जेक्ट Online Store developer required आहे. या व्हायरसला publicaffairs@, info@, clientservice@ या माध्यमातून पसरवण्यात येत आहे. या ईमेलसोबत brief.doc ही अॅटॅचमेंटही पाठवली जात आहे. हा व्हायरस कॉम्प्युटरमधील .doc, .docx, .txt, .rtf, .xls, .xlsx, .pdf या फाईल्स सर्च करुन त्याद्वारेही माहितीची चोरी करण्याचा प्रयत्न करत आहे.