एअर स्ट्राईकची ती व्हायरल क्लिप आहे या व्हिडियो गेम मधील
आपल्या देशाच्या एअर फोर्स ने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा जोरदार पाऊस पडत आहे. या उत्साहाच्या भरात अनेकांकडून एअर स्ट्राईकविषयी चुकीची माहिती देखील शेअर होते आहे. एअर स्ट्राईकची बातमी आल्यानंतर काहीवेळातच एक व्हीडिओ क्लीप सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली, क्लीपमध्ये विमानाच्या दिशादर्शन प्रणालीद्वारे दहशतवाद्यांचे बंकर्स उद्ध्वस्त केले जाताना असे समोर दिसते आहे. स्ट्राईकसाठी भारतीय वायूदलाने मिराज-२००० या विमानांचा वापर केला होता. या विमानांतील लेझर गाईडेड बॉम्बनी जैश-ए-मोहम्मदचा तळ बेचिराख केला, त्यामुळे सुरुवातीला ही क्लीप एअर स्ट्राईकचीच असल्याचा सगळ्यांचा समज झाला तर काही प्रसारमाध्यमांनीही ही क्लीप प्रसारित केली होती. त्यामुळे अजून गोंधळ वाढला होता. काही वेळातच अनेक जाणकारांनी या क्लीपच्या सत्यतेविषयी शंका निर्माण केली. तेव्हा ही व्हीडिओ गेममधील क्लीप असल्याचे सिद्ध झाले. व्हायरल व्हीडिओ क्लीप पाहताना हे व्हीडिओ गेममधील दृश्य असेल, याचा अंदाज पटकन आला आणि, मात्र, बारकाईने पाहिल्यास या व्हीडिओ क्लीपच्या बॅकग्राऊंडला इंग्रजीतील सूचना ऐकू येत असून, शंका आल्यानंतर काहीजणांनी याबद्दल माहिती शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ही व्हीडिओ क्लीप 'आर्मा-२' या गेममधील असल्याचे समोर आले. त्यामुळे कोणतही क्लिप पाहतांना एअर स्ट्राईकची आहेत का याची खात्री करणे गरजेचे आहे.