1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
  4. Virat got a bearded insurance, why was it?

विराटने चक्क दाढीचा विमा काढला, खर का?

Virat
विराट कोहलीने चक्क दाढीचा विमा काढला असल्याचे बोलले जात आहे. यात के एल राहुलने आपल्या ट्विटर अकाऊंटला एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये विराट कोहली सोफ्यावर बसलेला असताना दोन व्यक्ती त्याचे फोटो काढत आहेत. एका व्यक्तीने त्याच्या दाढीचा एक केस कापून एका प्लास्टिकमध्ये ठेवल्याचंही दिसत आहे. हे सीसीटीव्ही फुटेज असल्याचं दिसत आहे. ट्विट करताना के एल राहुलने लिहिलं आहे की,‘मला माहित होतं तुझं तुझ्या दाढीवर प्रचंड प्रेम आहे, पण आता तिचा विमा काढून तू माझी थिअरी खरी ठरवली आहेस’.
 
व्हिडीओत पाहिलं तर सगळं झाल्यानंतर विराट कोहली एका कागदावर सही करतानाही दिसत आहे. आता कोहलीने खरोखर दाढीचा विमा काढला आहे की के एल राहुल थट्टा करत आहे हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
पुढील लेख
एसटीचा संप, सरकारकडून अधिसूचना जाहीर जारी