बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 9 जून 2018 (09:17 IST)

युतीवर भाष्य करणारे राज यांचे बोलके व्यंगचित्र

शिवसेना - भाजप यांच्यातील युतीचे नाते पुन्हा जोडण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. त्याचाच एक भाग म्हणून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री' या निवासस्थानी भेट घेतली. युतीचा धागा पकडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना आणि भाजपला व्यंगचित्रातून जोरदार फटकारे हाणले आहेत.
 
राज यांनी मोदींनाही टोला लगावलाय. त्यांच्या 'मन की बात' या कार्यक्रमाचा आधार घेत 'भेट आणि मन की बात' या शिर्षकाखाली व्यंगचित्र सादर केलेय. यात दोन्ही नेते एकमेकांच्या पाठित खंजीर खूपसताना दाखविण्यात आलेय.