मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

जेव्हा विद्यार्थ्याने मोदींना विचारले, काय आपण लोकसभा निवडणुकीसाठी नर्व्हस आहात?

'परीक्षा पे चर्चा' या खास कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाळेतल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे ते 10वी आणि 12वीच्या परीक्षांसंदर्भात विद्यार्थ्यांशी बोलले.
 
आपण विसरू जा की पंतप्रधानांशी बोलत आहात आणि एखाद्या मित्रासोबत करतात तशी चर्चा करा असे म्हणून त्यांनी मन जिंकले. जाणून घ्या खास गोष्टी: 
 
* जवाहर नवोदय विद्यालय मुंगेशपुर दिल्ली येथील विद्यार्थी गिरीश सिंहने प्रश्न विचारला की "पीएम महोदय मी अकरावीत आहे आणि पुढील वर्षी माझी बोर्डाची परीक्षा आणि आपलीही कारण लोकसभा निवडणुका येत आहे. काय आपणही माझ्यासारखे नर्व्हस आहात? यावर मोदींने म्हटले की मी तुझा शिक्षक असतो तर तुला पत्रकार होण्याचा सल्ला दिला असता. कारण ज्याप्रकारे वळण देत तू प्रश्न विचारला आहे असं तर पत्रकारच करू शकतात. ते म्हणाले मी नर्व्हस नसून उमेदसह पुढलं पाऊल टाकतो.
 
* पीएम मोदीने म्हटले आपण लोकं टेन्शन घेत आहात का? आपण पंतप्रधानांशी बोलत आहात हे विसरून मी आपला मित्र आहे असा विचार करा.
 
* नोएडा येथील कनिष्का वत्सने पीएम यांना विचारले, 'एखादा विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करू इच्छित असला पण त्याचे मन भरकटत असेल तर काय करावे? पीएम म्हणाले प्रत्येक व्यक्ती दिवसातून एक तरी काम असं करतो ज्यासाठी त्याला आपले मन एकाग्र करावं लागतात.
 
* आपण मित्राशी बोलताना आपलं आवडतं गाणं येत असलं तरी आपण मित्राची गोष्ट लक्ष देऊन ऐकता अर्थात आपलं लक्ष गाण्यावरून मित्राच्या गोष्टीवर गेलेच तसेच स्वत: शोधा की असे कोणत्या गोष्टी आहे ज्यावर आपण लक्ष देता आणि असे का हे ही शोधून काढा. योग्य मार्गाद्वारे अभ्यासात लक्ष देणे शिकता येईल.
 
* शाळेत जाताना हे मनातून अगदी काढून टाका की आपण परीक्षा देण्यासाठी जात आहात. आपणच स्वत:ला मार्क्स देणार आहात या भावनेने परीक्षेत बसा.
 
* दिल्लीहून दीपशिखा आणि लडाखहून विद्यार्थ्यांनी प्रश्न केला की 'परीक्षेदरम्यान आई-वडील दबाव टाकतात परंतू संतुष्ट नसतात. याने मुलांच्या इच्छा मारून जाता. यावर मोदींनी विनोद करत म्हटले की मी पालकांची क्लास घ्यावी अशी इच्छा आहे का तुमची?
 
* मोदींनी म्हटले की मी पालकांना अपील करतो की मुलांना आपले सोशल स्टेट्स बनवू नका. प्रत्येक मुलात विशेष गुण असतात. कुटुंबाचे वातावरण मोकळे असावे. मुलं 18 वर्षाची झाली की त्यांना मित्र समजावे.
 
* या कार्यक्रमात मुख्य विषय बोर्ड परीक्षा आणि त्याच्या समस्या होत्या. परीक्षेदरम्यान ताण आणि भीती सारखी परिस्थितीहून कसे निपटावे यावर चर्चा झाली.
 
* मोदींनी म्हटले आत्मविश्वास जडी-बुटी नव्हे. जीवनात सर्व असले पण आत्मविश्वास नसल्यास काही नाही.
 
* मोदींनी काही दिवसांपूर्वीच विद्यार्थ्यांसाठी ‘एग्जाम वारियर’ नामक पुस्तक लिहिली आहे ज्यात परीक्षेसाठी 25 मंत्र सांगितले आहे ज्याने विद्यार्थ्यांचे मनोबल वाढेल. यात त्यांनी संदेश दिले आहे की परीक्षा हव्वा नाही, परीक्षेला घाबरण्याची गरज नाही. 193 पानांच्या या पुस्तकात 25 अध्यायांमध्ये 25 मंत्र देण्यात आले आहे. यात विद्यार्थ्यांसाठी योगासनही सांगण्यात आले आहे.