बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018 (09:13 IST)

मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी खास अॅप्लिकेशन

यापुढे मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी कोणत्याही रांगेत उभे रहावे लागणार नाही. घरबसल्या एका क्लिकवर एका अॅप्लिकेशनद्वारे मतदार यादीत समाविष्ट करता येणार आहे. ERONET (Electoral Rolls Services NeT)  असे या अॅप्लिकेशनचे नाव असेल. निवडणूकीच्या प्रक्रियेमध्ये डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देण्यासाठी हे अॅप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. यावर मतदार कार्डाच्या नोंदणीची, पत्ता आणि नाव बदलण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे आता मतदारांना या कामांसाठी मतदार केंद्रावर जाण्याची आवश्यकता नाही.
 
आतापर्यंत २२ राज्ये या अॅप्लिकेशनशी जोडण्यात आली आहेत. येत्या काळात जून महिन्यापर्यंत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यामध्ये जोडले जाणार असल्याचीही माहिती देण्यात आली. तर मेघालय, नागालँड, त्रिपूरा आणि कर्नाटकसारखी काही राज्ये विधानसभा निवडणूक झाल्यानंतर या सिस्टीमशी जोडली जाणार आहे. याबाबत मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी.रावत यांनी सांगितले.