बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018 (09:20 IST)

मनोहर पर्रिकर यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल

गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी रात्री अचानक पोटात दुखू लागल्याने पर्रिकर यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे त्यांना गोव्याच्या जीएमसीएच रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, अधिक चांगल्या उपचारांसाठी त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात हालवण्याचा निर्णय त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी घेतल्याने त्यांना तत्काळ मुंबईला हालवण्यात आले.