1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 11 फेब्रुवारी 2021 (13:51 IST)

हॉटेलमध्ये घुसला सिंह, व्हिडिओ व्हायरल

जुनागढ- सीसीटीव्ही कॅमर्‍यात कधी-कधी अशा काही घटना कैद होता ज्यामुळे आश्चर्य वाटू लागतं. अशीच एक थरकाप उडवणारी दृश्य जुनागढमधील एका सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. ज्यात एका हॉटेलमध्ये चक्क सिंह फिरताना‍ दिसत आहे. 
 
सोमवारी रात्री एक सिंह गुजरात येथील जुनागढमधील हायवेवर असणार्‍या एक हॉटेलमध्ये घुसला. रात्री घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आणि आता व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायल व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की सिंह हॉटेलमध्ये आला आणि थोडावेळ इकडे तिकडे फिरला नंतर शांतपणे निघूनही गेला. हा सगळा घटनाक्रम हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.
 
रात्रीच्या सुमारास हॉटेलमध्ये कुणीही नसताना सिंहाने बंद गेटवरून उडी मारली नंतर पोर्चपासून पार्किंगपर्यंत तो फिरत राहिला. थोड्या वेळाने तो उडी मारून गेटमधून बाहेरही निघून गेला.
 
हॉटेलचा गार्ड आपल्या लहानशा केबिनमध्ये शांतपणे बसून हे सगळं दृश्य पाहत होता. हे देखील कॅमेऱ्यामध्ये कैद झाले.


जुनागढमध्ये पहिल्यांदा असे घडले नसून बर्‍याचदा सिंह जंगलातून बाहेर येत असतात.