गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021 (11:51 IST)

अमेरिकेतील एका जोडप्यानं धोतर आणि साडी नेसून बर्फावरील केलं स्कीइंग

कोणतीही अॅक्टिव्हीटी करताना साधारणपणे त्यासाठी विशिष्ट प्रकारचा ड्रेस घालावा लागतो, ज्याने कोणत्याही प्रकाराचा अडथळा येत नाही. पण धोतर आणि साडी घालून बर्फावरील स्कीइंग करताना आपण कुणाला बघितलं तर काय म्हणाल? कमालच आहे...अमेरिकेतील एका जोडप्यानं चक्क धोतर आणि साडी घालून बर्फावरील स्कीइंग केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
 
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत एक जोडपं धोतर आणि साडी नेसून बर्फावरील स्कीइंग करताना दिसत आहे. अमेरिकेच्या मिनेसोटा येथील भारतीय वंशाच्या या जोडप्यानं हा पराक्रम करुन दाखवला आहे. दिव्या मैया असं या मुलीचं नाव आहे. तिनं आणि तिच्या पार्टनरने वेल्च या गावातील पर्वतरांगांमध्ये स्कीइंग करण्याचं ठरवलं. त्यांनी चक्क भारतीय पारंपरिक वेशभेषूत स्कीइंग केलं. काहीतरी वेगळं करण्याचं निश्चित करुन त्यांनी हे पराक्रम केलं. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत खास कॅप्शनही दिलं आहे.
 
या पोस्टमध्ये त्यांनी मासूम मिनावाला मेहता, हरिनी सेकर यांकडून प्रेरणा मिळाल्याचं श्रेय देखील दिलं आहे. नुकतंच फॅशन इन्फ्लुएन्सर मासूम मिनावाला मेहताने स्वित्झर्लंडमध्ये साडी नेसून स्वत: स्कीइंगचा व्हिडिओ अपलोड केला होता. 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by