रविवार, 2 ऑक्टोबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified गुरूवार, 4 फेब्रुवारी 2021 (12:29 IST)

पार्लरमध्ये फेशियल करणे पडले महाग, डॉक्टर महिलेच्या चेहर्‍याची झाली वाईट अवस्था

चेहर्‍याला फ्रेश आणि सुंदर लुक देण्यासाठी अनेक महिला आणि पुरुष पार्लरमध्ये जात असतात. परंतू सिलचर येथील एक महिलेला एका समारंभाआधी पार्लरमध्ये जाणे फारच महागात पडले. डॉ. बिनीता नाथ यांनी पार्लरमध्ये जाऊन फेशियल केल्यावर त्यांची त्वचा बर्न झाला असून चेहर्‍याची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे.
 
गुवाहाटीमध्ये एका लग्नाला हजेरी लावण्यापूर्वी त्यांनी एका पार्लरला भेट दिली आणि त्याच दरम्यान हा प्रकार घडला. सध्या त्या इटलीमध्ये राहतात, पोस्ट डॉक्टरल स्टडीसाठी त्या युनिव्हर्सिटी ऑफ रोममध्ये गेल्या होत्या. त्या काही दिवसांपूर्वी आपल्या मुळ शहर सिलचरमध्ये होत्या. 
 
या प्रकरणानंतर त्यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर करत घडला प्रकार सांगितला आणि लोकांना सतर्क केले आहे। डॉ. बिनीता यांनी या व्हिडीओमध्ये म्हटले की, त्यांच्या चेहऱ्यावर डिटॅनिंग करण्यासाठी ब्लिच लावण्यात आले तेव्हा त्यांन चेहर्‍यावर अत्यंत गरम काहीतरी टाकल्याचा भास झाल्यावर त्यांनी हटविण्याचे सांगितल्यावरही 5 मिनिटे तसेच राहू द्या म्हटले गले. हा त्रास उद्भवल्यावर त्यांनी तक्रार केल्यावर त्यांना नीट प्रतिक्रिया मिळाली नाही म्हणून व्हिडिओ द्वारे त्यांनी स्वत:बद्दल घडलेली घटना सगळ्यांसमोर मांडली. लग्नानंतर पाच वर्षांनी पहिल्यांदाच त्या एखाद्या पार्लरमध्ये गेल्यावर त्यांच्यासोबत हा प्रकार घडला.
 
हा प्रकार घडल्याच्या तिसऱ्या दिवशी त्यांनी हा व्हिडिओ अपलोड केला आणि लोकांना सतर्क केले आहे.