बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2020
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020 (16:23 IST)

अनुष्काने दिलं गावसकरांना उत्तर, गावस्कर यांनी केलं होतं आक्षेपार्ह वक्त्य

आरसीबी आणि पंजाब यांच्यातील सामन्यादरम्यान समालोचन करताना भारतीय माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. 
 
गावसकर यांनी आक्षेपार्ह शब्दांत केलेल्या टिप्पणीला अनुष्काने उत्तर दिले आहे. ती म्हणाली की आपण 2020 मध्ये आहोत आणि अजूनही काहीच बदललेले नाही. 
 
तिने म्हटले की मला क्रिकेटमध्ये ओढणे आणि उलटसुलट विधानांमध्ये गोवणे कधी थांबेल ? 
 
अनुष्काने असेही विचारलेय की, तुम्ही इतर किती तरी वेगळे शब्द वापरू शकत होतात. वेगळ्या प्रकारे समजावून सांगू शकत होता पण माझे नाव जोडल्यानेच त्या शब्दांना अधिक समर्पकता येत होती का? 
 
तिने लिहिले की मिस्टर गावसकर, आपण एक लीजेंड आहात आणि मला फक्त हे सांगायचे आहे की जेव्हा आपण असे म्हणाल तर मला कसं वाटतं असेल. मला खात्री आहे की, इतके वर्षे कॉमेंट्री करताना तुम्ही इतर खेळाडूंच्या खासगी आयुष्याचा सन्मान राखला असणार. आमच्याबाबतही तुम्ही तोच सन्मान राखायला हवा असे तुम्हाला वाटत नाही का? 
(Photo : Instagram)
नेमकं काय घडलं?
24 सप्टेंबर रोजी, पंजाबविरोधातील सामन्यादरम्यान आरसीबीचा कर्णधार विराट कोहली पूर्णपणे अपयशी ठरला. कोहली फक्त एक धाव काढून शेल्डन कॉट्रेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. तो बाद होऊन माघारी परतताना आयपीएलमधील समालोचक सुनील गावसकर यांनी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. गावसकर म्हणाले की, “यांनी लॉकडाऊनमध्ये केवळ अनुष्काच्या चेंडूची प्रॅक्टिस केली आहे.”
 
उल्लेखनीय आहे की गावसकरांनी हे वक्तव्य विराट-अनुष्काच्या लॉकडाउन दरम्यान शेअर व्हिडिओ संदर्भात दिले आहे ज्यात विराट हे अनुष्का सोबत क्रिकेट खेळताना‍ दिसले होते.