1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 18 एप्रिल 2018 (16:01 IST)

'या' व्हायरल पोस्टरची जोरदार चर्चा

हा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करू नका, हा इसिसचा ग्रुप आहे, असं सांगणाऱ्या एका व्हायरल पोस्टरची सध्या जोरदार  चर्चा सुरू आहे. हे पोस्टर महाराष्ट्र पोलिसांच्या नावे दिसत आहे. आता  एटीस विभाग या पोस्टरमागे नेमका कोणाचा हात आहे, याचा शोध घेत आहे.
 

काही दिवसांपासून एका पोस्टरचा फोटो व्हॉट्सअॅपवर फिरत आहे. या पोस्टरवर महाराष्ट्र पोलीस या शीर्षकाखाली एक सूचना करण्यात आली आहे. इंटर स्कूल नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करू नका. तो इसिसचा ग्रुप असून एकदा जॉईन केल्यानंतर ग्रुपबाहेर पडता येत नाही. तेव्हा काळजी घ्या, अशा अर्थाची ही सूचना आहे.