बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

" बी.पी. आणि शुगर "

चांगल्या असो का  वाईट असो
घडणाऱ्या गोष्टी घडत असतात 
मोठी होतांना मुलं पडत पडत घडत असतात 
डोक्याला जास्त 
ताण करून घ्यायचा नाही
आणि सारखा सारखा बी.पी.
वाढऊन घ्यायचा नाही
 
मुलं अभ्यास करत नाहीत 
समजून सांगावं 
घरातलं काम करत नाहीत 
पुन्हा पुन्हा सांगावं 
भविष्यात त्याचं कसं होईल 
जास्त काळजी करायची नाही 
सारखा सारखा आपण आपला
बी.पी.वाढऊन घ्यायचा नाही
 
तुम्हाला वाटतं पोरींन 
स्वयंपाकात लक्ष घालावं 
भाजी नाहीतर नाही 
पिठलं तरी हालवावं
 
दिवट्या चिरंजीवान 
मोबाईलशी कमी खेळावं 
आल्या गेल्या पाहुण्यांशी 
दोन शब्द बोलावं
 
पोट्ट मात्र अजिबात 
थोबाडवर करत नाही 
आपण आपली शुगर लेव्हल 
मुळीच वाढू द्यायची नाही
 
ऑफिस असो घर असो 
कुणीच कुणाचं ऐकत नसतं 
ज्याला जसं वाटेल तसं 
प्रत्येजन वागत असतं
 
आपण मात्र उगीचच 
फुकटचे सल्ले देत असतो 
समोरच्या माणसावर त्याचा 
परिणाम होत नसतो
 
छातीवर हात ठेऊन सांगा
 
तुम्ही काळजी केली म्हणून 
कोणते कोणते प्रश्न सुटूले
पोट्टे तुम्हाला विचारणारच 
आमच्यासाठी काय केले ?
 
सरते शेवटी कोणतीच गोष्ट 
मनाला लावून घ्यायची नाही 
बी.पी. आणि शुगर सुद्धा 
अजिबात वाढू द्यायची नाही
 
मरण यायच्या आधी थोडं 
स्वतःसाठी जगून जा 
सगळ्या सोबत असूनही 
थोडं बाजूला होऊन जा
 
आपलं कोणी ऐकत नसतं 
तेंव्हा जास्त बोलू नये 
त्यांचं ते बघून घेतील 
जास्त ओझं उचलू नये
 
बी.पी. आणि शुगर सुद्धा 
Tension मुळे होत असतात
गोळ्या, औषधं घेतले की 
बिचारे गुपचप बसत असतात
 
काहींच्या बाबतीत "  ती "
वडिलोपार्जित प्रॉपर्टी असते 
रजिस्ट्री नाही केली तरी 
तिकडून ईकडे येत असते
 
चालत जावं , फिरत जावं 
डॉक्टर सांगतील ते ऐकत जावं,
 योग, प्राणायाम करत करत 
आनंदाने लढत राहावं 
 
आपल्या हार्टच्या ECG ला
आपण बिघडू द्यायचं नाही 
" बी.पी." आणि " शुगर "ला 
जास्त वाढू द्यायचं नाही .