शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 8 ऑगस्ट 2018 (14:31 IST)

जगातील सर्वात गरीब राष्ट्राध्यक्ष

आपण किती साधे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न जगभरातील नेतेमंडळी करत असतात. पण आज तुम्हाला एका अशा राष्ट्राध्यक्षाबाबत सांगणार आहोत जे खरोखर अत्यंत साधे जीवन जगायचे. त्यांच्या देशाचा कारभारही चांगल्या पद्धतीने चालवत होते. राष्ट्राध्यक्षांनी 2015 साली पद सोडल्यानंतरही त्यांच्या साधेपणात काही कमी झालेले नाही. ते आहेत उरुग्वेचे माजी राष्ट्राध्यक्ष जोस म्युजिका. वर्षाला केवळ 12 हजार डॉलर एवढे वेतन जोस घ्यायचे आणि त्यातील 90 टक्के रक्कम दान देऊन टाकायचे. ते 40 वे उरुग्वेचे अध्यक्ष होते. कधीही राष्ट्रपती भवनामध्ये जोस हे राहिले नाहीत. ते पत्नीबरोबर एका अत्यंत साध्या फार्महाऊससारख्या घरात राहायचे. कोणत्याही प्रकारचा मोटारींचा ताफा ते वापरत नसत. ते एका पिटुकल्या गाडीमधूनच प्रवास करुन आपली कामे व जबाबदार्‍या पार पाडत. केवळ 2 लाख 15 हजार डॉलर एवढी जोस दाम्पत्याची एकत्रित संपत्ती आहे.