शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 1 ऑगस्ट 2018 (14:38 IST)

ही आहे जगातली सर्वात सुंदर मुलगी

worlds beautiful girl
सध्या सोशल मीडियात एका मुलीचे फोटो चर्चेचा विषय ठरत असून ही ५ वर्षांची मुलगी जगातली सर्वात सुंदर मुलगी असल्याचं बोललं जात आहे. अनेकांना हे अशक्य वाटतं पण हे सत्य असल्याचं सांगितलं जात आहे. ही मुलगी नायजेरियाची असून तिचं नाव Jare Ijalana हे आहे. सावला रंग, सुंदर डोळे आणि आत्मविश्वासाने पोज देणाऱ्या या मुलीचे फोटो  Mofe Bamuyiwa या फोटोग्राफरने काढले आहेत. 
 
Ijalana चे सुंदर फोटो Bamuyiwa ने ट्विटर आणि इन्स्टाग्रावर शेअऱ केले आहेत. या फोटोंना 'ओह! ती एक मनुष्य आहे...ती एक परी आहे', असं कॅप्शन दिलं आहे. Ijalana च्या सुंदरतेचं सध्या भरभरुन कौतुक केलं जात आहे. पण ही ५ वर्षांची मुलगी मॉडल म्हणून समोर येत असल्याने काहींनी फोटोग्राफरवर टीका सुरु केली आहे. पण लोकांच्या टीकेकडे फोटोग्राफर काही लक्ष देत नाहीये. Ijalana ला दोन बहिणीही आहेत.