शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 6 मे 2021 (12:51 IST)

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग

सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर पॅक होत असल्याचा व्हिडिओ व्हायरस होत आहे. हा व्हिडिओ उल्हासनगर येथील असून धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. नंतर उल्हासनगर महापालिका प्रशासनाने परिसरात तपासणी केली असता हा प्रकार उघडकीस आला आहे.
 
कोरोनाची तपासणीसाठी अँटिजन किंवा RTPCR टेस्ट केली जाते. यासाठी टेस्ट वापरल्या जाणा्ऱ्या टेस्ट कीटमध्ये एक स्वॅब स्टिक असते. कोरोना तपासणीसाठी जागतिक आरोग्य संघटनेने प्रमाणित केलेले कीटच वापरले जातात. पण अशात या स्वॅब स्टिक घराघरातच पॅकिंग केल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगरमधील ज्ञानेश्वरनगरमध्ये उघडकीस आला आहे.
 
या व्हिडिओत काही महिला आणि मुलं पॅकिंग करताना दिसत आहे. स्वॅब किट पॅकिंग करताना कुणीही मास्क घातलेला नाही किंवा कोणत्याही प्रकारची सुरक्षिततेची काळजी घेतली जात नसल्याचं दिसून येत आहे. जमिनीवर पॅकिंग केली जात आहे अशात कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणरे किट कितपत सुरक्षित आहेत, असं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. 
 
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उल्हासनगर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, वैद्यकीय अधिकारी तसेच उल्हासनगर पोलिसांनी ज्ञानेश्वरनगरमधील घरांमध्ये धाड टाकली. यावेळी घराघरात जाऊन तपासणी करत काही घरातून स्वॅब स्टिकचा साठा ताब्यात घेण्यात आला. या परिसरातील 10 ते 15 घरात या स्टिकची पॅकिंग सुरु होती आणि दिवसाला एका घरात पाच हजार स्टिक पॅकिंग केली जात होते. या प्रकरणाचा शोध घेतला जात आहे.