नवनीत राणा कमळ चिन्हावर लढणार
पाच वर्षांमध्ये नवनीत राणा यांनी संसदेत भाजपला पूरक भूमिका घेतल्याचे फडणवीस यांनी सांगितले होते. त्यामुळे नवनीत राणा यांना भाजपची उमेदवारी मिळणार, हे जवळपास निश्चित होते. मात्र, त्यांच्या या उमेदवारीला शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांच्याकडून तीव्र विरोध करण्यात आला होता. राजकारण सोडावे लागले तरी चालेल, पण मी नवनीत राणांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका अडसूळ यांच्याकडून घेण्यात आली आहे. तर दुसरीकडे प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सुद्धा राणांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. पण या सर्व विरोधातूनही भाजपाकडून राणांनाच उमेदवारी देण्यात आल्याने यामुळे आता पुढे काय होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नवनीत राणा यांच्या बोगस जातप्रमाणपत्राचा निकाल हा 1 एप्रिलला सुप्रीम कोर्टात लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर का हा निकाल राणांच्या बाजूने लागला असता तर भाजपाकडून 4 एप्रिलला त्यांच्या नावाची घोषणा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, भाजपाने त्याआधीच राणांना उमेदवारी जाहीर करत मोठे स्फोट केला आहे. त्यामुळे 2019 ला अपक्ष लढून विजयी झालेल्या नवनीत राणा 2024 च्या लोकसभेत भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Edited by Ratnadeep Ranshoor