मी 5 वर्षातून एकदा जुगार खेळतो राज ठाकरे यांचे वक्तव्य
महायुतीचे रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे कणकवलीच्या सभेत उपस्थित होते. राज ठाकरे महायुतीला पाठिंबा दिल्यावर प्रथमच सभेला संबोधित करत होते. ते म्हणाले मला जुगार खेळता येत नाही, पण मी 5 वर्षातून एकदा जुगार खेळतो.
ते म्हणाले, मी मनसे पक्षाची स्थापना केल्यावर एक उदाहरण दिले होते. आज पुन्हा देतो. मलेशियाला मी गेलो होतो तिथे जेंटिक हायलँड नावाची जागा आहे. त्यावेळी तिथे एक हॉटेल होत. तिथे पोहोचल्यावर मी विचारपूस केली असता त्यांनी सांगितले हे कॅसिनो आहे. त्यानंतर मी शर्मिला आणि इतर दोघांसोबत तिथे गेलो. मला जुगार खेळता येत नाही. आत गेलो आणि भिंगऱ्या फिरवू लागलो.10 मिनिटात मी त्या कॅसिनो मधून बाहेर पडलो. आणि बाहेर एक बार होता तिथे जाऊन बसलो. तेव्हा माझं सहज लक्ष वर गेलं तिथे एक पाटी लिहिली होती. त्यावर लिहिले होते मुस्लिमांना परवानगी नाही. खरंतर मलेशिया हे मुस्लिम देश आहे. मी त्यांना विचारलं की हे असं कशासाठी लिहिले आहे. या वर ते म्हणाले, मुस्लिम धर्मात दारूपिणे चुकीचे आहे आणि जुगार देखील मान्य नाही.
या वर मी त्यांना विचारलं की तुम्हाला कसं कळत की माणूस मुस्लिम आहे ? या वर त्याने उत्तर दिले की आम्ही कोणाला थांबवत नाही. असा किस्सा राज ठाकरे यांनी सांगितला. स्वतःच्या देशाची प्रगती करण्यासाठी जर एक देश धर्माला बाजूला करत असेल तर आपण काय संस्कृती घेऊन बसलो आहोत. गोव्या सारखे चित्र कोकणात दिसले तर आमची संस्कृती खराब होते असं म्हटलं जात. गोवा आणि केरळची संस्कृती वाईट आहे का असा प्रश्न या वेळी त्यांनी विचारला.
Edited By- Priya Dixit