शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 4 मे 2024 (17:04 IST)

काँग्रेसची दुर्दशा सुरूच! काँग्रेसच्या उमेदवाराने लोकसभेचे तिकीट परत दिले

congress
सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून प्रचाराच्या माध्यमातून पक्ष आणि विपक्ष एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करत आहे. काही ठिकाणी अनेकांना इच्छाअसून देखील उमेदवारी मिळत नाहीए. अशातच काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराने चक्क लोकसभेचे तिकीट परत दिले आहे.उमेदवारी परत करताना उमेदवाराने तिकीट परत देण्याचे कारण देखील सांगितले आहे. या घटनेमुळे काँग्रेला मोठा धक्का बसला आहे. 

ओडिशातील पुरी लोकसभा मतदार संघातून काँग्रेच्या सुचरिता मोहंती यांनी पुरी लोकसभा मतदार संघाची उमेदवारी परत काँग्रेस पक्षाला दिली आहे. पक्षाने मला उमेदवारी दिली पण निधी दिलेला नाही म्हणून मी उमेदवारी परत करत असल्याचे मोहंती म्हणाल्या. तसेच या लोकसभा मतदारसंघातील सात विधानसभा मतदारसंघातील काही जांगांवर विजयी असलेल्या उमेदवारांना उमेदवारीच दिली नाही. त्याऐवजी काही कमकुवत उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत मला पक्षाचा प्रचार करणे शक्य वाटत नाही. 

मोहंती म्हणाल्या मी जेव्हा पक्षाला उमेदवारी परत दिली तेव्हा मला पक्षाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. मला निधी मिळत नसल्याने मला पक्षाने स्वतःचा निधी उभारण्यास सांगितले. पक्षाकडे विधानसभेच्या जागेसाठी चांगले उमेदवार द्यावे अशी मागणी करून देखील पक्षाने त्यावर कोणतीही दखल घेतली नाही. या घटनेमुळे काँग्रेसवर नामुष्की ओढवल्याचे दिसून आले. 
 
Edited By- Priya Dixit