गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: रविवार, 19 मे 2024 (14:25 IST)

Lok sabha elections 2024 : भाजपला आता आरएसएसची गरज नाही,उद्या ते आरएसएसला नकली म्हणतील- उद्धव ठाकरे

uddhav thackeray
देशात 20 मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. या पूर्वी पक्षांनी प्रचारसभा घेतल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा नुकतीच मुंबईत पार पडली. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे  यांची शिवसेना नकली असल्याचे म्हणत घणाघात टीका केली. 

त्यांना प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत भाजपवर आणि मोदींवर जोरदार टीका केली. आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या मुलाखतीचा संदर्भ दिला. यामध्ये जेपी नड्डा यांनी सांगितले की, सुरुवातीला जेव्हा भाजप कमकुवत होता तेव्हा त्याला आरएसएसची मदत आवश्यक होती, परंतु आता पक्षाची ताकद वाढली आहे, त्यामुळे तो स्वतंत्रपणे चालवू शकतो आणि स्वतःला सांभाळू शकतो. 

उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपला आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) गरज नाही आणि लवकरच त्यावर बंदी घालणार असल्याचे त्यांनी शनिवारी सांगितले. हे शाब्दीचे वर्ष संघासाठी धोक्याचं ठरणार आहे.  पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पक्षाला नकली शिवसेना म्हणून म्हटले आहे. उद्या ते आरएसएसला देखील नकली म्हणतील.भाजप एके दिवशी संघाला देखील संपवणार देशात हुकूमशाहीची ही सुरुवात आहे. असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजप आणि मोदींवर टीकास्त्र सोडले. 
   
या परिषदेला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार आणि इतर ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते. 
पीएम मोदींनी राज्यभरातील त्यांच्या अनेक निवडणूक रॅलींमध्ये शिवसेना (यूबीटी) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) यांना 'नकली' कसे म्हटले याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ठाकरे म्हणाले की, निवडणुकीचा निकाल 4 जूनला येऊ द्या. मग त्यांना कळेल की खरी सेना कोण आणि खोटी कोण. ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे नेहमीच संकटकाळात मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आता तेच मोदी त्यांच्या (बाळासाहेबांच्या) पक्षाला 'नकली ' म्हणतात.
  
Edited by - Priya Dixit