सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Updated : मंगळवार, 26 मार्च 2024 (09:37 IST)

महादेव जानकर यांनी अचानक यु-टर्न घेऊन सर्वांनाच धक्का दिला

Mahadev Jankar
प्रतिभा धानोरकर यांना भाजपाच्या सुधीर मुनगंटीवार यांच्याविरुद्ध मैदानात उतरवले आहे. तर, सोलापुरात प्रणिती शिंदेंविरुद्ध भाजपाने आमदार राम सातपुते यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघात भाजपाने उमेदवारी जाहीर केली असून महाविकास आघाडीकडून महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात येणार होती. यासंदर्भात जानकर यांनी शरद पवारांची भेटही घेतली होती. मात्र, ऐनवेळी जानकरांनी पलटी मारली अन् महायुतीत सहभागी झाले. त्याचं मतपरिवर्तन अचानक कसं झालं, यावरही त्यांनी भाष्य केलं.  
 
राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी अचानक यु-टर्न घेऊन सर्वांनाच धक्का दिला. विशेष म्हणजे दोन तासांपूर्वी माढ्यातून महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झाला म्हणून ज्यांचं नाव होतं, त्याच महादेव जानकरांनी महायुतीत पुन्हा घरवापसी केली. तसेच, जानकर यांच्या रासप पक्षाला लोकसभेची एक जागाही देण्यात येणार असल्याची घोषणा महायुतीने केली आहे. त्यानंतर, जानकर यांनी प्रतिक्रिया देताना, शरद पवारांचे आभार मानले. मात्र, आपण महायुतीत परतल्याचेही स्पष्ट केले. 

Edited By - Ratnadeep Ranshoor