1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 7 मे 2024 (20:11 IST)

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

death
आज लोकसभा निवडुकीत महाराष्ट्रावर 11 लोकसभा मतदार संघासाठी मतदान झालं. कोल्हापूर मतदारसंघात मतदान सुरु असताना मतदानासाठी आलेल्या एका 69 वर्षीय वृद्धाला हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महादेव श्रीपती सुतार(69 , उत्तरेश्वर पेठ कोल्हापूर) असे यांचे नाव आहे. 

देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी असताना आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी 7 मे रोजी झालं. या तिसऱ्या टप्प्यात कोल्हापूर मतदार संघाचा समावेश देखील आहे. 
कोल्हापुरात उत्तरेश्वर पेठेत राहणारे महादेव सुतार हे रमाबाई आंबेडकर शाळेत मतदान करण्यासाठी गेले असता त्यांना अचानक मतदान केंद्रावर भोवळ आली आणि ते खाली कोसळले. 

त्यांना खाली कोसळलेल पाहता मतदान केंद्रातील राजकीय पक्षाचे कार्यकर्त्यांनी सीपीआर मध्ये दाखल केले डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अचानक घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 
 
Edited By- Priya Dixit