1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 8 मे 2024 (22:30 IST)

महाविकासआघाडीची सांगवीत प्रचार सभा, देशाचा पंतप्रधान इंडिया आघाडीचा होईल उद्धव ठाकरे यांचा विश्वास

uddhav thackeray
महाविकास आघाडीचे मावळ लोकसभा मतदार संघाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ सांगावी येथे महाविकास आघाडीची सभा झाली. या सभेला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे उपस्थित होते. या वेळी सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंत प्रधान मोदींवर टीका केली. ते म्हणाले पराभवाची भीती वाटत असल्याने विरोधक राम राम करत असून मोदींना महाराष्ट्राने रस्त्यावर आणले आहे.

त्यांच्यावर रोड शो करण्याची वेळ आली आहे. चार जून नंतर ,मोदी पंतप्रधान नसून महाविकास आघाडीचाच पंतप्रधान देशाचा होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निवडूक जाहीर झाल्यावर मी पहिली उमेदवारी संजोग वाघेरेंची जाहीर केली. मोदी सरकारला पराभवाची भीती वाटत असून ते राम राम करत आहे.  महाराष्ट्रात मोदींना रस्त्यावर येण्याची वेळ आली असून ते रोडशो करत आहे.  

हे मोदी सरकार म्हणजे गजनी सरकार आहे आपण काल काय बोललो हेच त्यांना लक्षात राहत नाही. निवडणूक रोख्यांचा घोटाळा जगातील सर्वात मोठा घोटाळा असून रोजगार देखील कंत्राट पद्धतीने दिले.मोठे मोठे उद्योगाचे प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर नेले. महाविकास आघाडीचा पंप्रधान निवडून आल्यावर महाराष्ट्राचे लुटले वैभव पुन्हा आणू. 

सभेत बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आपण आज जर योग्य निर्णय घेतला नाही तर देशात पुन्हा निवडुका होणार नाही. संविधान बदलून जाईल. असे होऊ देऊ नका. मोदींच्या 10 वर्षाच्या काळात चुकीचे निर्णय घेतले गेले. अर्थव्यवस्था मंद झाली असून देशावर कर्ज आहे.ही निवडणूक महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, भ्रष्टाचार आणि गलिच्छ राजकारण या पाच मुद्द्यांवर लढली जात आहे.महाराष्ट्रात फूट पाडण्यासाठी मोदींचा पाठिंबा होता. 

दिल्लीत मोदींची सरकार पाडायची आहे. नाहीतर संविधान बदलले जाईल. शेतकरी, तरुण वर्ग महागाईने बेकारीने त्रस्त झाला आहे. देशाची जनताच मोदींना पडणार येत्या चार जून नंतर सत्तांतर होणार. असे चव्हाण म्हणाले.  
 
Edited by - Priya Dixit