मंगळवार, 15 एप्रिल 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 11 मे 2024 (18:28 IST)

इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर राम मंदिराचे शुद्धीकरण शंकराचार्यांच्या हस्ते करणार -नाना पटोले

Nana Patole
सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्व पक्ष आपापल्यापरी प्रचार करत आहे. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी पक्ष निवडून आल्यावर अयोध्याच्या राम मंदिराचे शुद्धीकरण शंकराचार्य कडून केले जाणार असे वक्तव्य देत वादाला तोंड दिले आहे. 

पटोले यांनी दावा केला आहे की, पंतप्रधान मोदींनी राम मंदिराचे मंदिराच्या उभारणीत प्रोटोकॉलच्या विरोधात काम केले असून, विरोधी आघाडीचे सरकार आल्यास हे दुरुस्त केले जाणार असून अयोध्येतील राम मंदिराचे शुद्धीकरण शंकराचार्यांच्या हस्ते होणार.असा दावा पटोले यांनी केला. 
 
शंकराचार्य याचा (प्राण प्रतिष्ठा) विरोध करत असल्याचे काँग्रेस नेत्याने सांगितले. चारही शंकराचार्य राम मंदिराचे शुद्धीकरण करतील. त्या ठिकाणी राम दरबाराची स्थापना करण्यात येणार आहे. तिथे प्रभू रामाची मूर्ती नाही, तर रामलालाचे बालरूप आहे.

नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या उभारणीत प्रोटोकॉलच्या विरोधात काम केले असून काँग्रेसची सत्ता आल्यावर आम्ही त्यात सुधारणा धर्माच्या माध्यमातून करू. 
22 जानेवरी रोजी एका भव्य कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी राम मंदिराच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा समारंभाचे नेतृत्व केले आणि राम मंदिर सर्वांसाठी खुले करण्यात आले. या अभिषेक सोहळ्याला 10,000 हुन अधिक लोकांनी सहभाग घेतला. मात्र या अभिषेक सोहळ्याला चारही शंकराचार्यांचा विरोध होता. ते म्हणाले, 

चार पैकी तीन शंकराचार्य म्हणाले हा सोहळा हिंदू धर्म ग्रंथानुसार आयोजित केला जात नाही. मात्र 22 जानेवरीच्या कार्यक्रमाच्या ते विरोधात नाही किंवा पंतप्रधान मोदींच्या विरोधात नाही. पण ज्योतिर्मठचे शंकराचार्य म्हणाले की एका निर्माणाधीन मंदिरात प्रभू रामाची मूर्ती बसविणे हे धर्मग्रंथाच्या विरोधात आहे. 
पटोले यांनी दावा केला की महाविकास आघाडी महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक मध्ये 48 जागांपैकी 35 हुन अधिक जागा जिंकणार. तर राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेत्तृत्वाखाली असलेली महायुती तुटण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले. 

Edited by - Priya Dixit