बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. लोकसभा निवडणूक 09
Written By वार्ता|
Last Modified: सोमवार, 13 एप्रिल 2009 (22:46 IST)

उद्धवचे उत्तर असमाधानकारक: आयोग

पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करणारे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केलेला खुलासा निवडणूक आयोगाने मान्य केला नाही. उद्धव यांनी असमाधानकारक खुलासा दिल्याचे केंद्रीय निवडणूक उपायुक्त आर. बालकृष्णन स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे यांनी शिवडी येथे झालेल्या सभेत पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान काढले होते. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पक्षाला आणि उद्धव ठाकरे यांना नोटीस बजावली होती. त्याचा उद्धव यांनी केलेला खुलास आयोगाने अमान्य करीत राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना उद्धव ठाकरे यांच्या सभांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ते कोणतेही आक्षेपार्ह विधान करत नाही ना? या कडे लक्ष द्यावे असे म्हटले आहे.