शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह कोटेशन
Written By
Last Modified: शनिवार, 15 मे 2021 (08:57 IST)

International Day of Families wishes in Marathi जागतिक कुटुंब दिनानिमित्त शुभेच्छा

घर असावे घरासारखे
नकोत नुसत्या भिंती,
इथे असावा प्रेम-जिव्हाळा
नकोत नुसती नाती...
जागतिक कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
 
ताकद आणि पैसा
हे जीवनाचे फळ आहे,
परंतु एकत्र कुटुंब
हे जीवनाचे मूळ आहे.
जागतिक कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
आपल्या कुटुंबाबाबत रोज विचार करा, 
फक्त जगाला दाखवण्यासाठी किंवा इतरांकडून कौतुक करून घेण्यासाठी नाही. 
जागतिक कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
घर किती मोठं आहे,
हे महत्वाच नाही,
घरात सुख किती आहे
हे महत्वाच आहे.
जागतिक कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,
 
शांतता ही घरातील लक्ष्मी आहे,
पैसा हा घराचा पाहूणा आहे,
व्यवस्था ही घराची शोभा आहे,
समाधान हेच घराचे सुख आहे…!
जागतिक कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
 
आयुष्याच्या शर्यतीत प्रत्येकजण धावतच आहे
पण या शर्यतीत धावण्याचं बळ मिळतं ते कुटुंबाकडून
म्हणूनच कुटुंबाला वेळ द्या
नव्या ऊर्जेसाठी आणि उमेदीसाठी,
घरीच राह सुरक्षित रहा.
जागतिक कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
 
कुटुंब घड्याळ्याच्या काट्या सारखं असले पाहिजे,
कोणी बारीक.., कोणी मोठं..,
कोणी स्लो.., कोणी फास्ट..,
पण जेव्हा कोणाचे १२ वाजणार असेल
तेव्हा सर्व एकत्र असले पाहिजे.
जागतिक कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
 
संयम आपल्या चरित्राची किंमत वाढवतो 
तर मित्र आणि कुटुंब आपल्या आयुष्याची किंमत वाढवतात. 
जागतिक कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...