बुधवार, 4 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Updated : बुधवार, 6 नोव्हेंबर 2024 (11:08 IST)

भाजपची आपल्याच पक्षावर मोठी कारवाई, 40 नेत्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

भाजपने पक्षशिस्त न पाळल्याबद्दल आणि नियम तोडल्याबाबदल 37 वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातून 40 नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाने आपल्या पक्षातील बंडखोर नेत्यांवर मोठी कारवाई केली आहे. नुकतेच आगामी निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने भाजप आणि महायुतीच्या अनेक नेत्यांमध्ये नाराजी असल्याने नेते व कार्यकर्त्यांनी पक्षाविरोधात बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.
 
तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार इतर महायुती आणि भारतीय जनता पक्षातील बड्या नेत्यांनी बंडखोर नेत्यांची मनधरणी करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यानंतर काही नेत्यांनी आपले अर्ज मागे घेतले पण काहींनी आपल्या म्हणण्यावर ठाम राहून शेवटच्या क्षणापर्यंत अर्ज मागे घेतले नाहीत.
 
आता यावर कारवाई करत भारतीय जनता पक्षाने मोठा निर्णय घेतला असून भाजपच्या 37 जागांवर बंडखोरी करणाऱ्या 40 बंडखोर नेत्यांना पक्षातून बाहेर काढण्याची घोषणा केली आहे. पक्षाने एक यादी जाहीर केली असून त्यात पक्ष धर्म न पाळणाऱ्या 40 नेत्यांना पक्षातून काढून टाकण्याची घोषणा करण्यात आली आहे.
 
भाजपने जाहीर केलेल्या या यादीत धुळ्यातील श्रीकांत कार्ले आणि सोपान पाटील, जळगाव शहरातील मयूर कापसे आणि अश्विन सोनवणे, अकोटमधून गजानन महाले, वाशीममधून नागेश घोपे, बडनेरामधून तुषार भारतीय, अमरावतीमधून जगदीश गुप्ता, अचलपूरमधून प्रमोदसिंह गद्रेल या नेत्यांचा सहभाग आहे.  
 
साकोली येथील सोमदत्त करंजेकर, आमगांवमधून शंकर मडावी, चंद्रपूर मधून ब्रिजभूषण पाझारे, ब्रम्हपूरीमधून वसंत वरजुरकर, वरोरा मधून राजू गायकवाड आणि अतेशाम अली, उमरखेड मधून भाविक भगत तर नटवरलाल उंतवल, नांदेड उत्तर मधून वैशाली मिलिंद देशमुख आणि मिलिंद उत्तमराव देशमुख इत्यादी कार्यतकर्यांचा सहभाग आहे. 

Edited By- Dhanashri Naik