गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: मंगळवार, 19 नोव्हेंबर 2024 (18:31 IST)

विनोद तावडे यांच्या बचावासाठी भाजपचा विरोधकांवर बदनामी केल्याचा आरोप

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. मंगळवारी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर रोख रक्कम वाटल्याच्या आरोपात EC ने एफआयआर दाखल केली आहे. या नंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. पैसे वाट्ल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. हितेंद्र यांनी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील विरार येथील विवांता हॉटेल मध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी  रोख रक्कम वाटप केल्याचा आरोप केला आहे. 

विनोद तावडे यांनी याबाबत संपूर्ण खुलासा केला आहे. तर भाजप आता विनोद तावडेंच्या बचावात उतरली आहे.
भाजपचे खासदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी म्हणाले की,हा सर्व महाराष्ट्रात एमव्हीएचा खोडसाळपणा असून तावडे यांच्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात आले आहे. ते आमचे राष्ट्रीय सरचटणीस असून पक्षांची अनेक कामे बघतात. मतदारसंघाच्या उमेदवाराने त्यांना बैठकीला बोलावले असता ते तिथे गेले होते. मतदान प्रक्रिये बाबत कार्यकर्त्यांना सूचना देण्यासाठी बैठक घेतात. हॉटेलच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासावे अशी मी विनंती करतो. 
 
पाच कोटी रुपये खिशात घालता येणार नाहीत, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. जर कोणी घेऊन जात असेल तर ते दिसेल. त्यांनी पुरावे दाखवावे आणि बिनबुडाचे आरोप करू नयेत.

महाराष्ट्र भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, आज भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे जी नालासोपारा येथील स्थानिक कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांना उद्याचे काय आणि काय करू नये हे समजावून सांगत होते. त्याचवेळी आमच्या विरोधी लोकांनी त्यांच्या विरोधात कट रचून विनोद तावडे आणि भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न केला.प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेतली असून या प्रकरणाची चौकशी करत आहे. 
Edited By - Priya Dixit