गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Updated : मंगळवार, 19 नोव्हेंबर 2024 (16:47 IST)

मतदानापूर्वी भाजप नेते विनोद तावडे यांच्याविरोधात एफआयआर

vinod tawde
Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक उद्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होणार आहे. मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. 
 
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 2024 च्या मतदानाच्या काही तास आधी एक मोठी बाब समोर आली आहे. वास्तविक, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर महाराष्ट्रातील एका हॉटेलमध्ये पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर करून काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला आहे.
 
या व्हिडीओ मध्ये भाजपचे नेते दिसत आहे त्यांच्या भोवती मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती आहे. काही जण त्यात घोषणेबाजी करताना तर काही जण गोंधळ घालताना दिसत आहे. तर काही जण चोर- म्हणत घोषणा देत आहे. भाजपचे नेते त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडीओ मध्ये दोन पोलीस दिसत असून ते परिस्थिती नियंत्रणात करण्याचा प्रयत्न करत आहे. 

काही लोकांच्या हातात लिफाफे देखील असतात, ज्यातून ते 500 रुपयांच्या अनेक नोटा काढतात आणि त्यांना ओवाळतात. त्याचवेळी या प्रकरणी विनोद तावडे यांनी आपण कार्यकर्त्यांना भेटण्यासाठीच हॉटेलमध्ये गेल्याचे सांगितले. मी निवडणूक आयोगाकडे या प्रकरणाची निःपक्षपातीपणे चौकशी करण्याची मागणी करतो. दुसरीकडे, निवडणूक आयोगाच्या तक्रारीवरून पोलिसांनी याप्रकरणी विनोद तावडे यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे.
 
मात्र, या प्रकरणाचे सत्य काय? हे तपासानंतरच कळेल. सध्या नालासोपारा येथील भाजपचे उमेदवार राजन नाईक यांच्यावर बहुजन विकास आघाडीने पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात भाजपचे वरिष्ठ नेते सामील असल्याचा आरोप भाजपने केला आहे. दुसरीकडे, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. पैसे वाटपाच्या सर्व चर्चा निराधार असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले. निवडणुकीच्या पूर्वसंध्येला बहुजन विकास आघाडीचा हा केवळ राजकीय स्टंट असल्याचे ते म्हणाले..
Edited By - Priya Dixit