शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: सोमवार, 7 ऑक्टोबर 2024 (16:01 IST)

विधानसभा निवडणुकीपूर्व शिवसेनेला धक्का, दीपेश म्हात्रे यांचा उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पुढील महिन्यांत  होण्याची शक्यता आहे. निवडणुकी पूर्व शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे नेते कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी स्थायी समितीचे सभापती दीपेश पुंडलिक म्हात्रे यांनी शिवसेना शिंदे गटाला राम राम करत उद्धव ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला.

त्यांनी शिवसेना शिंदे गटाला सोडचिट्ठी देत रविवारी त्यांच्या समर्थकांसह उद्धव ठाकरे यांच्या नेत्तृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला.त्यांचा सह इतर सहा नगरसेवकांनी देखील उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.  

उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील मातोश्री निवासस्थानी एका कार्यक्रमात त्यांच्या पक्षात प्रवेश केलेल्या नेत्यांचे स्वागत केले. ते म्हणाले, शिवसेनेच्या इतिहासात आजचा दिवस महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राला तरुण नेत्यांची गरज आहे. जे राज्यासमोर आलेल्या आव्हानां वर तोडगा काढू शकतील .

या वेळी बोलताना दीपेश म्हात्रे म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणे ही त्यांच्या व त्यांच्या समर्थकांसाठी अभिमानाची बाब आहे. मी डोंबिवलीचा मान परत मिळवून देईन अशी ग्वाही देतो. 
Edited by - Priya Dixit