सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Updated : मंगळवार, 17 सप्टेंबर 2024 (16:55 IST)

मलाही मुख्यमंत्री व्हायचंय, निवडणुकीपूर्वी अजित पवार म्हणाले

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024:महाराष्ट्र विधानसभा निवडणुका वर्षाच्या अखेरीस ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले मी राज्याचा मुख्यमंत्री होण्यासाठी खूप उत्सुक आहे. होय! मलाही मुख्यमंत्री व्हायचं आहे. 
 
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतींच्या मंदिरात पूजा केल्यावर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि ते म्हणाले. प्रत्येकाला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटते. हे सांगतांना माझे नाव देखील त्यात येते. मात्र इच्छा असून काहीही उपयोग नाही त्यासाठी बहुमत मिळणे आवश्यक आहे. 
प्रत्येकाची स्वतःची इच्छा आणि मत असते. 

आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला बहुमत द्यायचे हे सर्व मतदारांच्या हातात आहे. राज्यात एकूण 288 जागा आहे. सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला 145 जागांचा निम्मा टप्पा पार करावा लागणार आहे. 
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती एकत्र निवडणूक लढवणार आहे. निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेत्तृत्वाखाली लढवणार आहे.असे ते म्हणाले. 
Edited by - Priya Dixit