शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: रविवार, 1 सप्टेंबर 2024 (15:56 IST)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्यात जागावाटपावर चर्चा

shinde panwar fadnavis
या वर्षीच्या अखेरीस महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहे. अद्याप जागावाटप बाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपबाबत चर्चा झाली. नागपुरात या बाबत महत्त्वपूर्ण बैठक झाली. ही बैठक शनिवारी सुमारे 3 तास झाली. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक चर्चेच्या शेवटच्या २-३ फेऱ्या नंतर कालबैठक घेण्यात आली असून अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. 

या बैठकीत भाजप सर्वाधिक जागा लढवणार आहे. 173 जागांवर करार झाला आहे. भाजप नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनाचा पक्ष नंतर अजित पवारांचा पक्ष असून उर्वरित 115 जागांबाबत निर्णय महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या बैठकीत लवकरच घेण्यात येणार.
Edited By - Priya Dixit