बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Updated : शनिवार, 16 नोव्हेंबर 2024 (09:31 IST)

निष्क्रिय आमदाराला घरचा रस्ता दाखवा, हडपसर येथे शरद पवार यांचे वक्तव्य

Sharad Pawar
हडपसर (Hadapsar) विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत सुदाम जगताप (Prashant Jagtap) यांच्या प्रचारार्थ माळवाडी, हडपसरमध्ये आयोजित जाहीर सभेत शरद पवार  यांनी निष्क्रिय आमदाराला घरचा रस्ता दाखवा असे वक्तव्य दिले.

ते म्हणाले, एकेकाळी हडपसर हे सामाजिक चळवळीचे केंद्र होते. अनेक बड्या कंपन्या या ठिकाणी आहेत. या भगत अण्णासाहेब मगर, रामराव तुपे सारख्या मोठ्या मंडळींनी आपापले योगदान दिले. त्यानी सामान्य माणसासाठी काम केले. त्यांच्या पश्चात त्यांना मुलगा वारसा जपणार असे वाटत होते मात्र त्यांनी असे काहीच केले नाही म्हणुन आता निष्क्रिय आमदारांना घरचा रास्ता दाखवण्याची वेळ आली आहे.ते तुम्हीच करावे. कामाचा माणूस निवडणे हे तुमच्या हड़पसर च्या लोकांच्या हातात आहे.   
या वेळी प्रशांत जगताप यांच्यासह माजी खासदार ॲड. वंदना चव्हाण, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार ॲड. जयदेव गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, समाजवादी नेते प्रा. सुभाष वारे, माजी महापौर अंकुश काकडे, राष्ट्रवादीच्या युवती अध्यक्ष सक्षणा सलगर, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे भगवानराव वैराट, माजी उपमहापौर बंडूतात्या गायकवाड, माजी नगरसेवक योगेश ससाणे, ॲड. हेमा पिंपळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे, उपशहरप्रमुख समीर तुपे, राष्ट्रवादी’चे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रवीण तुपे, रवींद्र माळवदकर, माजी नगरसेवक विजय देशमुख, निलेश मगर, प्रशांत सुरसे, पल्लवी सुरसे, नमेश बाबर, गायक राजेश सरकटे आदी उपस्थित होते.

दिलीप तुपे, अनिल तुपे, कुमार तुपे, संजय साळवे, अहमद काझी यांनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.
 
राज्याच्या गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात 13 हजार मुली बेपत्ता आहेत. महिलांना सन्मान व सुरक्षा देण्यात अपयशी ठरलेल्या महायुती सरकारची सुट्टी करण्याची वेळ आली आहे,” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला.

“सत्ताधारी केवळ स्वार्थाचे राजकरण करीत आहेत. शेतकरी, महिला, तरुण यांच्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत आहेत, ही दुःखाची गोष्ट आहे.शेतकऱ्यांसाठी महायुती काहीच करत नाही. हे दुर्दैवी आहे. बेरोजगारी, महगाईच्या ओझ्याने सर्व सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे.

राज्यात कायदा व् सुव्यवस्था नाहीच. सत्ताधारीचे लोक जनतेची फसवणूक करून स्वत:ची प्रसिद्धि आणि घरे भरण्याचे काम करत आहे. असे म्हणत महायुती वर हल्लाबोल केला. तुतारी फुंकणारा माणूस तुमच्या हिताचा असणार आहे. तोच तुमच्या सुखदुःखात सहभागी होऊन आपुलकीची फुंकर घालणार आहे. तेव्हा येत्या 20 तारखेला तुम्हाला वाऱ्यावर सोडणाऱ्याची सुट्टी करून तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह दाबून प्रशांत जगताप यांना निवडून देण्याचे आवाहन करतो, असे पवार (Sharad Pawar) म्हणाले.
Edited By - Priya Dixit