शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. महाराष्ट्र बजट
Written By
Last Modified: मंगळवार, 8 मार्च 2022 (19:27 IST)

फडणवीसांचा पेन ड्राइव्ह बॉम्ब, राज्य सरकारच्या षड्यंत्राचे पुरावे असल्याचा दावा

देवेंद्र फडणवीस  यांचा विधानसभेत हल्ला बोल. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देवेंद्र फडवणीस यांनी राज्य सरकारच्या षड्यंत्राचे पुरावे असलेला पेन ड्राइव्ह विधानसभा अध्यक्षांकडे दिला.
 
फडणवीस म्हणाले, मी पाच वर्षं गृहमंत्री आणि मुख्य मंत्री म्हणून कार्य केलं. मला महाराष्ट्राच्या पोलीस दलाचं मोठं आभिमान आहे. कायद्यानं आणि नियमानं काम करणे हे महाराष्ट्राच्या पोलीस दलाचे वैशिष्ट्य आहे. पण अलीकडील काही काळात या नियमानं चालणाऱ्या पोलीस दलाचा गैर वापर करण्यात आला आहे. 
 
जर सरकारच असे षडयंत्र करत असेल तर लोकशाहीला काहीच अर्थ नाही. 
सध्या राज्यात काय चाललं आहे. ते सारं एका पेन ड्राइव्ह मध्ये आहे. सध्या कशी कट कारस्थाने सरकार शिजवतंय त्याचेही व्हिडीओ या पेन ड्राइव्ह मध्ये आहे. सव्वाशे तासाचे फुटेज माझ्या कडे आहे. हा पेन ड्राइव्ह मी अध्यक्षांकडे सुपूर्त करत आहे. असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे पेन ड्राइव्ह दिला.