संबंधित माहिती
- हा फिल गुड फॅक्टर निर्माण करणारा अर्थसंकल्प : अशोक चव्हाण
- अर्थसंकल्पात कधीही पूर्णत्वास न येऊ शकणा-या घोषणांचा पाऊस- बाळासाहेब थोरात
- महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023 : अर्थसंकल्प म्हणजे स्वप्नांच्या दुनियेत फिरवून आणण्याचा प्रयत्न- अजित पवार
- महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023 : शेतकऱ्यांसाठी घोषणा, पीक विमा योजनेसाठी भरावा लागणार फक्त 1 रुपया
- Maharashtra Budget 2023 शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पातून राज्याला काय मिळणार
वाचा, राज्यातील अर्थसंकल्पामधल्या महत्त्वाच्या घोषणा आणि तरतुदी अशा
अमृत काळातील पहिला अर्थसंकल्प.
पंचामृत ध्येयावर आधारित
१. शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी
२. महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास
३. भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास
४. रोजगारनिर्मिती
५. पर्यावरणपूरक विकास
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना मिळणार आहे. यासाठीच सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर केली आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार 12 हजार रुपये मिळतील. प्रति शेतकरी, प्रति वर्ष 6000 रुपये राज्य सरकार देणार आहे. केंद्र सरकारचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये शेतकऱ्यांना प्रतिवर्ष मिळणार आहेत. राज्यातील 1 कोटी 15 लाख शेतकरी कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी 6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार आहे. तशी घोषणा फडणवीसांनी विधिमंडळात केली.
– छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाचे यंदाचे हे 350 वे वर्ष. यानिमित्त या महोत्सवासाठी 350 कोटी रुपयांची तरतूद
– आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान उभारणार. त्यासाठी 50 कोटी रुपये
– मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्याने उभारणार : 250 कोटी रुपये
– शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय उभारणार. तसेच, शिवकालिन किल्ल्यांचे संवर्धन यासाठी 300 कोटी रुपये
– महिलांना राज्य परिवहन महामंडळांना बस प्रवासाच्या तिकीट दरात सरसकट 50 टक्क्यांची सूट;
– महात्मा फुले जनआरोग्य योजनेत उपचारखर्च दीड लाखावरुन 5 लाख करण्यात येणार.
– राज्यभर हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत 700 दवाखाने सुरु करणार.
– गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आता राज्य सरकारकडून, लाभही 2 लाखांपर्यंत
– गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना यापूर्वी विमा कंपन्यांकडून
– आता गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना
– धनगर समाजाला 1000 कोटी रुपये
– महाराष्ट्र मेंढी, शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करणार
– 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार
Edited by : Ratnadeep Ranshoor
Edited by : Ratnadeep Ranshoor
